कोरोनावर मात केलेल्यांना निरोप

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनावर मात केलेल्या दोन रूग्णांना आज निरोप देण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, पहूर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्रणाली सुरु झाल्यानंतर आज प्रथमच बुधवारी वाकोद आणि वडाळी येथील दोन रूग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे त्यांना वैद्यकिय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे अधिपरिचारक अनुजा मेहत्रे, दिपक वाघ, ललीत केवट, संजय सुरवाडे , श्रीमती गोयर यांनी गुलाब पुष्प देऊन निरोप दिला. यावेळी रुग्णांनी कृतज्ञ भाव व्यक्त केले.

दरम्यान, आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये पहूर पेठ येथील एक तरुण व एक तरुणी बाधित झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे येथील बाधितांची संख्या १०६ वर पोहचली आहे. तर, पहूर पेठ येथील वयोवृद्धेचा काल उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच पिंपळगाव कमानी तांडा येथील ५७ वर्षीय महिलेचाही जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. जळगाव येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update

Protected Content