ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील पोद्दार शाळेजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारासह दुचाकीवर मागे बसेलला तरुण असे दोन्ही जखमी झाल्याची घटना घडली होती, या अपघात प्रकरणी शुक्रवारी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव तालुक्यातील नशीराबाद येथील रहेमान शहा गुलाबशहा वय ५५ व हकीम शाहा अनामतुल्ला शहा हे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दोघेही एम.एच. १९ डी क्यू ५३८६ या क्रमाकांच्या दुचाीवरुन मिस्तरी कामासाठी पाळधी येथे जात होते, या दरम्यान जळगाव शहरातील पोद्दार शाळेजवळ महामार्गावर जी जे ३७ टी ७१६१ या क्रमाकांच्या ट्रकने रहेमशन शहा यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली, या अपघातात दुचाकीस्वार रहेमान शहा यांच्यासोबत दुचाकीवर मागे बसलेले हकीम शहा हे या दोघांना दुखापत होवून दोघेही जखमी झाले, तसेच या दुचाकीचेही नुकसान झाले, याप्रकरणी जखमी रहेमान शहा याच्या फिर्यादीवरुन जी जे ३७ टी ७१६१ या क्रमाकांच्या ट्रकवरील चालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे हे करीत आहेत.

Protected Content