जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव नशिराबाद दरम्यान आयशरट्रकने ने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारासह दुचाकीवर मागे बसलेला एक जण असे दोघे गंभीर जखमी झाले होते, या अपघातप्रकरणी सोमवार, ३१ जुलै रोजी नशीराबाद पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील खंडेराव नगर येथील रहिवासी शशिकांत निवृत्ती वडतकर वय ४१ हे २७ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांचे शालक प्रवीण सुभाष पाटील याच्यासोबत एम.एच. १९ डी डी ०८०३ या क्रमाकांच्या दुचाकीने नशीराबादहून जळगावकडे येत होते, यादरम्यान चुकीच्या बाजूने येणाऱ्या एम.एच. ४८ ए जीएस १९२२ या क्रमाकांच्या भरधाव आयशर ट्रकने वडतकर यांच्या दुचाकीला धडक दिली, या धडकेत वडतकर व त्यांचे शालक प्रवीण पाटील या दोघांना गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झााले. याप्रकरणी तीन दिवसानंतर वडतकर यांनी सोमवारी नशीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अपघातास कारणीभूत आयशर ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नूर मोहम्मद अजमल खान हे करीत आहेत.