पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अनेकांचे श्रद्धास्थान असलेले कुसुंबा प्राचीन अतिशय दिगंबर जैन क्षेत्रावर यावर्षी महान तपस्वी मुनीवर्यांचा चातुर्मास संपन्न होणार आहे. याकडे उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे लक्ष वेधले असुन अखेर येथील पार्श्वनाथ सेवा समितीचे पद्मावती युवा मंच शिष्टमंडळाने महाराष्ट्रात वास्तव्य असलेले मुनीवर्यांचे दर्शन घेऊन कुसुंबा क्षेत्रावर चातुर्मासासाठी कुसुंबाकरांच्या भावना व्यक्त करून अर्घ चढवून विनयपूर्वक विनंती केली.
मंडळाचे अधिक परीश्रम व भावना दृढतेमुळे संभाजीनगर येथील सद्यस्थित वास्तव्य असलेले विशाल संघाचे गणनायक प.पु. आचार्य विभवसागरजी महाराज यांना कुसुंबा क्षेत्राविषयी व समाजाच्या भावना प्रकट करून नगरात चातुर्मास विषयी विनंती केली.पूज्य आचार्यश्रींनी पद्मावती युवा मंच व समाज बांधवांच्या भावनेचा आदर करून त्यांनी आपले संघातील दोन मुनिश्रींना कुसुंबा क्षेत्रावर चातुर्मास करीता आज्ञा दिली तर त्यांनाही चातुर्मास विषयी श्रीफळ चढविण्यात आल्याने मुनिश्रींचे ७ जुलै रोजी आगमन होणार आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साह संचारला असून या पार्श्वभूमीवर स्वागत मिरवणुकीची व चातुर्मासाची जय्यत तयारी सुरू झाल्याची माहिती प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त व खान्देश जैन समाजाचे प्रसिद्ध प्रमुख पत्रकार सतीश वसंतीलाल जैन आणि महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली. दरम्यान तपस्वी दिगंबराचार्य प.पु.आचार्य विभवसागरची महाराज यांचे परमशिष्य प.पु. १०८ श्री सागर जी महाराज व प.पु.श्री १०८ श्रमसागर जी महाराज या मुनीश्रींचे आगमन होणार आहे.खान्देशातील कुसुंबा एकमेव दिगंबर जैन क्षेत्रावर दरवर्षी पद्मावती युवा मंच विशेष परिश्रमाने चातुर्मास घडवून आणतात याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.