Home Cities यावल चितोडाजवळ दोन मोटार सायकलींची धडक; तिघे जखमी

चितोडाजवळ दोन मोटार सायकलींची धडक; तिघे जखमी


यावल (प्रातिनिधी) येथून जवळ असलेल्या चितोडा गावाजवळ दोन मोटारसायकलींमध्ये टक्कर होवुन एका महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत.

 

तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा यात्रेचे शेवटचे दोन दिवस सोमवारी पूर्ण होत असुन, या मुंजोबाच्या दर्शनासाठी गेलेले किरण दिलीप जैन, रा.यावल व वैभव गोपाळ इंगळे, यांच्या मोटरसायकलींमध्ये समोरा-समोर टक्कर होवुन यात किरण वैभव जैन यांच्या उजव्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. यातील दुसरा मोटारसायकलस्वार वैभव गोपाळ इंगळे व त्याची आई उषा गोपाळ इंगळे (रा. हिंगोणा) हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताचे वृत कळताच यावल पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील यांनी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात भेट देवुन जखमींची विचारपुस केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound