रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात लंम्पी आजाराचा थैमान सुरु असून अहीरवाडी, केऱ्हाळा परिसरातील दोन गायींचा मृत्यू झाला आहे. यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रावेर तालुक्यातील लंम्पीग्रस्त भागाला भेट द्यावी. अशी मागणी पशुपालक करत आहे.
अहीरवाडी, केऱ्हाळा परिसरातील राजू तडवी व गोपाल सोनवणे दोन गायींचा लंम्पी आजाराने मृत्यू झाला आहे. अनेक गुरे लंम्पी आजाराने त्रस्त असून रावेर तालुक्यात लंम्पी थैमान थांबता नाहीये. दरम्यान परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रावेर तालुक्यातील लंम्पीग्रस्त भागाला भेट द्यावी. अशी मागणी पशुपालकांतर्फे करण्यात येत आहे.