दुचाकीची चोरी करणारे दोन अल्पवयीन मुले पोलीसांच्या ताब्यात

फैजपूर प्रतिनिधी । गावापासून जवळ असलेल्या बामणोद गावातील मोटरसायकल चोरी प्रकरणीतील दाखल गुन्ह्यात फैजपूर दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील पाच चोरीच्या दुचाक्या हस्तगत केल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीसनिरीक्षक प्रकाश वानखडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याआधारे पथक तपासकामी यावल तालुक्यातील अंजाळे गावामध्ये दाखल झाले.तेथील दोन विधीसंर्ष बालक यांच्याकडून बामणोद दुरक्षेत्र भागातील चोरीस गेलेल्या पाच मोटारसायकली एक हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर काळ्या रंगाचामोटरसायकल (एमएच 19 बीएफ 7820) एक हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर काळ्या रंगाचा मोटरसायकल (एमएच 19 सीए 7351) एक हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर काळ्या रंगाचा मोटरसायकल (एमपी 68 एमई 3282),एक हिरो होंडा कंपनीची फॅशन प्रो.काळ्या रंगाचा विना नंबरची,एक हिरो होंडाकंपनीची सुपर स्प्लेंडर काळ्या रंगाचा मोटरसायकल विना नंबरची अशा पाच चोरीस गेलेल्या मोटारसायकली हस्तगत केल्या असून सदर मोटारसायकली हस्तगत करणेसाठी अत्यंत शिताफीने व कोटेखोरपणे तपास करण्यात आला असून यापुढे सुद्धा अशाच पद्धतीची चोराविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे सपोनि प्रकाश वानखडे यांनी सांगितले.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश वानखडे, पोलीस उपनिरीक्षक मसुलोद्दीन शेख, रोहिदास ठोंबरे, स.फौ.हेमंत सांगळे, पोहेकॉ देविदास सुरदास, पोना किरण चाटे, महेश वंजारी, उमेश सानप, अनिल महाजन, पोकॉ चेतन महाजन अशांनी मिळून चोरीच्या पाच मोटरसायकल आरोपींकडून हस्तगत करून जप्त केलेल्या आहेत.

 

Protected Content