नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्यावर हल्ला करणारे दोघे ताब्यात

4poice theft 4

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळ्यातील भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या कार्यालयात येवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍या दोघे फरार आरोपींना रामानंद नगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल भिका कोळी (वय-२१) व अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी (वय-२२) रा. दोघे पिंप्राळा या दोघांनी नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या कार्यालयावर येवून त्यांच्यावर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्लाचा प्रयत्न करणार्‍या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघे पिंप्राळ्यातील राहत्या घरी आले असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी संभाजी पाटील व ज्ञानेश्‍वर कोळी यांना मिळाली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा विशाल भिका कोळी, अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी या दोघांना ताब्यात घेवून न्यायालयात हजर करण्यात आले.

Protected Content