Home Cities यावल दोन दिवसात दोन दिग्गज बँड मास्टर काळाच्या पडद्याआड !

दोन दिवसात दोन दिग्गज बँड मास्टर काळाच्या पडद्याआड !

0
192
(Image Credit Source: Live Trends News )

यावल-अय्यूब पटेल | केवळ जळगाव जिल्हा वा महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील आघाडीचे बँड मास्टर असणारे येथील दोन दिग्गज बँड चालक दोन दिवसात काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

(Image Credit Source: Live Trends News )

यावल शहरातील दोन बॅन्ड पार्टी च्या रूपाने संपुर्ण महाराष्ट्रात यावल शहराची आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे एस. एच. ब्रॉस बॅड पार्टीचे मालक मास्टर अक्रम खान यांचे दिनांक ३० ऑगस्ट रोजी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तर दोनच दिवसांपूर्वी याच प्रकारे देशभर प्रसिध्द असलेल्या युसुफ ब्रॉस बँन्ड पार्टीचे मालक कालु मास्टर यांचे २८ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

यामुळे अवघ्या दोन दिवसांमध्ये दोन ख्यातनाम बँड मास्टर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. विशेष बाब म्हणजे हे दोन्ही मान्यवर एकमेकांचे आतेभाऊ-मामेभाऊ होते. यामुळे कला क्षेत्राप्रमाणेच कौटुंबिक पातळीवर देखील या दोन्ही कुटुंबियांवर आघात झाला आहे.

यावल येथील प्रसिद्ध युसुफ ब्रास बॅन्ड वाजंत्रीचे मालक तथा माजी नगरसेवक कालु मास्टर ( वय ६२ वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत असतांना निधन झाले. तर त्यांचे आत्याभाऊ व त्यांचे मामेभाऊअसे प्रसिद्ध एस. एच. खान ब्रॉस बॅन्ड पार्टीचे मालक मास्टर अक्रम खान सांडे खान वय ५७ वर्ष यांचे ही उपचारा दरम्यान निधन झाले आहे.


Protected Content

Play sound