बामणोद येथे विहिरीत पडल्याने दोन मजूरांचा जागीच मृत्यू

यावल – लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद येथे विहिरीचे खोदकाम करतांना दोन मजूरांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाव घेतली आहे.

 

बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल दोन्ही रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर असे मयत झालेल्या मजूरांची नावे आहे. याबाबत माहिती अशी की,  यावल तालुक्यातील बामणोद गावातील झांबरे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. याठिकाणी विहिरीचे खोदकाम करत असतांना अचानक दोर बांधलेला लोखंडी खुंटा उपटल्याने काम करणाऱ्या बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल दोन्ही रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर या दोन्ही मजूरांना तोल जावून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरूवार १० मार्च रोजी रात्री १० वाजता घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैजपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.  याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर, पोउनिरी मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पो.ना. किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप हे घटनास्थळी दाखल झाले असून रात्री अंधारात मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे व शोध घेणे शक्य न झाल्याने सकाळी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

Protected Content