खामगाव अमोल सराफ । पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील नितीन राठोड हे शहीद झाले असून यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात बुलढाण्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. नितीन राठोड आणि संजय राजपूत अशी या जवानांची नावे असून या दोघांच्या गावात शोककळा पसरली आहे.
या हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील नितीन राठोड हे शहीद झाले आहेत. लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावातील नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झाले आहे. या गावात नितीन राठोड नावाचे दोन तरूण असून दोघेही सीआरपीएफमध्येच कार्यरत आहेत. गावात संभ्रमाचे वातावरण होते. त्यामधील एक जण शहीद झाला आहे. तर संजय राजपूत यांच्या भावांना याची माहिती मिळाली असली तरी आई आणि पत्नीला यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. संजय राजपुत हे मलकापुरातील महाकाली नगरात राहतात. ते शहीद झाल्याची वार्ता दुपारी येथून धडकताच परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या दोन्ही शहिदांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.