श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरच्या पिंगलीना येथे सुरू असलेल्या चकमकीत घरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात यश आले असून यात जैशचा कमांडर कामरान व गाझी राशीदचा समावेश आहे.
याबाबत वृत्त असे की, पुलवामा परिसरातील पिंगलीना येथील एका घरात लपून बसलेल्या अतिरेक्यांना भारतीय जवानांनी घेरून चकमक सुरू झाली होती. आज पहाटे तीन वाजेपासून ही चकमक सुरू होती. यात चार भारतीय जवान पुन्हा शहीद झाले. तर दहशतवाद्यांना भारतीय जवानांची चोख प्रत्युत्तर दिले. स्थानिक नागरिकांनी घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना मदत केल्याची धक्कादायक बाब यातून दिसून आली. आज सकाळीसुध्दा चकमक सुरूच होती. यात अखेर लपून बसलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैशचा कमांडर कामरान व गाझी राशीदचा समावेश आहे. हे दोन्ही पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाईंड होते. हे दोन्ही लपून असणार्या इमारतीला उडवून देण्यात आल्याने हे सैतान यमसदनी रवाना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.