घरफोडी करणारे दोन संशयित अमळनेर पोलीसांच्या ताब्यात

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना अमळनेर पोलीसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “अमळनेर शहरात दोन सराईत गुन्हेगार हे रेल्वेस्टेशन आवारात फिरत असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सुचना दिली. पथकाने रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशन परिसरात गस्तीवर असतांना संशयित आरोपी आकाश अंबर पांचाळ रा. जुने बसस्थानक, अमळनेर हा त्याचा साथीदार शाहरुख इल्लू पटेल रा. सुप्रीम कॉलनी,जळगाव यांच्यासोबत संशयास्पद रित्या फिरत असल्याची हालचाली दिसून आल्या.

त्यानुसार पथकाने त्यांना विचारपूस केले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केले असता त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दोन घरफोडीची कबुली दिली आहे. दोघांकडून चोरीचा ११ भार वजनाची चांदीचे पैंजण हस्तगत केली आहे.”

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोनि. जयपाल हीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॅा सुनील हटकर, चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील, कैलास पवार, निलेश मोरे, राहुल पाटील यांनी केली. दोन्ही संशयित आरोपींवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Protected Content