पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील नागसेन नगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका कुटुंबाला लोखंडी रॉड, चॉपर आणि हॉकी स्टिकने मारहाण केली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा शहरातील नागसेन नगरात अनुराग मांगो खेडकर वय ३४ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान २४ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अनुराग याच्या गाडीचा कट मरून गाडी पायावरून गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून संशयित आरोपी राकेश अहिरे, अविनाश उर्फ भैय्या अहिरे, भूषण राजू अहिरे, रितेश संजय अहिरे, राजू अमृत अहिरे आणि धीरज ज्ञानेश्वर खेडकर सर्व रा. जनता वसाहन, पाचोरा यांनी अनुराग खेडकर व त्यांच्या कुटुंबियांना लोखंडी रॉड, चॉपर, हॉकी स्टीक व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात तीन जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अनुराग खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राकेश अहिरे, अविनाश उर्फ भैय्या अहिरे, भूषण राजू अहिरे, रितेश संजय अहिरे, राजू अमृत अहिरे आणि धीरज ज्ञानेश्वर खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.




