जुन्या भांडणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील रवंजे बुद्रुक गावातील दूध डेअरी समोर जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले असून परस्पर विरोधात एकूण १० जणांवर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील रवंजे बुद्रुक गावातील दूध डेअरी समोर रविवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी करण्यात आली. यामध्ये एकमेकांना लाथाबुक्क्यांनी व चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली तर एकमेकांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये पहिल्या फेऱ्यात राजेंद्र मोहन कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात राजीव तापीराम देशमुख, गोकुळ देवराम देशमुख, महेंद्र राजू देशमुख, समाधान भगवान देशमुख आणि लोकेश गोकुळ देशमुख सर्व राहणार रवंजे बुद्रुक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या गटातील राजीव तापीराम देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंकज कोळी, राजू मोहन कोळी, राकेश मोहन कोळी, हिरालाल राजू कोळी आणि मोहन भिवसन कोळी सर्व रा. रवंजे बुद्रुक यांच्या विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जुबेर खाटीक आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश पाटील हे करीत आहे.

Protected Content