Home क्राईम रावेरात शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल

रावेरात शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल


MARAMARI
 

रावेर (प्रतिनिधी) शेतीच्या वादातुन दोन गटात हाणामारी होवून तीन जण जखमी झाल्याची घटना येथील शेतीशिवार मध्ये घडली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

 

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेख गुलाम शेख यूसुफ यांच्या शेती गट क्र 975 मध्ये शेख शाहिद शेख इस्माईल (मन्यार), शेख कलीम, शेख सादीक,शेख मतीन शेख इमरान (तळेले कॉलनी भुसावळ) आदी सात जणांनी शेत नांगरले होते. याचा जाब विचारल्याने आरोपींनी फिर्यादी व शेख करीमला चापटा बुक्यांनी तसेच लोखंडी विळाने जबर दुखापत केली. यासंदर्भात शेख गुलाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या तक्रारीत शेख शाहिद शेख इस्माईल यांच्या गट शेती क्र 972 मध्ये काटेरी झुरपे तोडून शेतात टाकले. या करणावरुन शेख गुलाम शेख यूसुफ, शेख सादिर शेख सलिम, शेख सोयब (रा. रावेर) व शेख शफी (रा. किनगाव ता. यावल) यांनी शेख शाहिद यास चापटाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे कॉ जितेंद्र पाटील हे करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound