Home क्राईम कांडवेल येथे बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त

कांडवेल येथे बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त

0
25

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कांदवेल शेती शिवारात आज दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सुत्रांकडून मिळलेले माहितीनुसार, कांडवेल शेती-शिवार मध्ये बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या आहे. यामुळे कांडवेल परिसरातील शेतकरी व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती वनपाल अतुल तायडे यांना समजताच ते आपल्या कर्मचाऱ्‍यांसह घटना स्थळी गेले व पगमार्ग बघितले असता हल्ला करणारा प्राणी बिबट असल्याचे निष्पन्न झाले. वनपाल अतुल तायडे यांनी नागरीकांना सर्तक राहण्याच्या सूचना केल्या असून बिबट्यासाठी या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे.

 

 


Protected Content

Play sound