Home क्राईम दुचाकीचा धक्का लागल्यावर दोन मित्रांना बेदम मारहाण

दुचाकीचा धक्का लागल्यावर दोन मित्रांना बेदम मारहाण


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील जाम मोहल्ला येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन मित्रांना ५ जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकून दुखापत केल्याची घटना घडली. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकोला दाखल करण्यात आला.

सुशील गोविंदा शर्मा वय १८ राहणार भुसावळ हा तरुण त्याच्या मित्र मयूर याच्यासोबत दुचाकीने २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता जाम मोहल्ला परिसरातून जात होता. त्यावेळी दुचाकीचा धक्का लागल्यावर जाकीर खान मेहबूब खान ल, हाशिम खान जाकीर खान, शाहिद खान जहीर खान मेहमूदा सय्यद अहमद, तबस्सुम जाकीर खान यांच्या इतरांनी त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच रस्त्यावरील दगड उचलून सुशीलच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर सुशील शर्मा यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार मंगळवारी २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करत आहे.


Protected Content

Play sound