उघड्या घरातून महागडे दोन मोबाईल लांबविले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाल्मिक नगरात राहणाऱ्या एका प्रौढाच्या घरातून ३० हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली. याप्रकरणी बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, दिनेश ताराचंद सोनवणे वय ४२ रा. वाल्मिक नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ वाजेच्या दरम्यान त्यांच्या उघड्या घरातून अज्ञात चोरट्याने महागडे ३० हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना समोर आली. ही घटना उघडकीला आल्यानंतर दिनेश सोनवणे शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर बुधवार २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ योगेश माळी हे करीत आहे.

Protected Content