यवतमाळमध्ये दोन तर बुलढाणामध्ये एकाचा उष्माघाताने मृत्यू

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विदर्भात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भात उष्माघाताने तीन बळी घेतले आहेत. उष्माघाताने यवतमाळमध्ये दोघांचा तर बुलढाण्यात एकाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात सध्या 40 उष्मघाताच्या रुग्णांवर उपचार सुरू असून तहसील रुग्णालयात 14 आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात 66 असे एकूण 84 शीत कक्ष सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात उष्माघाताने नऊ महिन्याच्या चिमुकलीसह वृद्धाचा मृत्यू झाला आहे. बेलोरा येथील विद्या निलेश टेकाम असे मृत चिमुकल्या मुलीचे नाव आहेगेल्या तीन दिवसापासून यवतमाळ जिल्ह्याचा पारा ४६ अंशावर गेला आहे. अशातच नऊ महिन्याच्या चिमुकलीसह एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाला आहे. चिचमंडळ येथील दादाजी मारुती भुते असे 70 वर्षीय मयत वृद्धाचे नाव आहे.

बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी गेला आहे. संग्रामपूर येथे उष्माघाताने शेतात काम करत असलेल्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सचिन वामनराव पेठारे असे उष्माघाताने मृत्यू पावलेल्या 40 वर्षीय मजुराचे नाव आहे. सचिन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असून तो शेत मजूर म्हणून काम करत होता.पोलिसांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

Protected Content