
पाटणा (वृत्तसंस्था) बिहारमध्ये मंगळवारी रात्री वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २६ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
मंगळवारी झालेल्या मुसळधार पाऊस आणि विजेमुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये जुमाई भागात वादळात ८ जणांनी तर औरंगाबादमध्ये विजेच्या धक्क्यानं ७ जणांचा जीव गेला. बाका जिल्ह्यातही तीन वेगवेगळ्या घटनांत ३ जणांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये आतापर्यंत पुराने आतापर्यंत १२४ जणांचा बळी घेतला आहे. तर ७७ लाख नागरिकांना पुराचा फटका बसलाय.