यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळवद येथे एकाने विष प्राशन करून तर चुंचाळे येथील एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना आज घडल्या.
या संदर्भात पोतीस सुत्रांनी दिलेली माहीती अशी की आज दिनांक २३ जुलै रोजी कोळवद तालुका यावल येथील राहणारे बळीराम सिताराम पाटील (वय ५० ) यांनी कोळवद शिवारातील आपल्या शेतात २० .२०वाजेच्या सुमारास शेतात विष प्राशन केले असता त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी असलम शेख करीत आहेत.
दरम्यान तालुक्यातील दुसर्या एका घटनेत चुंचाळे गावातील राहणारे चाळीस वर्षीय जयसिंग विष्णु पाटील हे चुंचाळे गाव ते साकळी या मार्गावरील रस्त्यावर आज दिनांक २३ जुलै रोजी गुरुवार सकाळी शेतात कामाला जातो असे सांगुन घरून निघाले. यानंतर चुंचाळे गाव ते साकळी दरम्यानचुंचाळे फाटयावर एका शेताच्या बांधावर असलेल्या झाडाच्या फांदीस जयसिग यांने आपल्या जवळील रूमालाने गळ्फास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत जयसिंग विष्णु पाटील हे मुळ बोरखेडा बुद्रुक तालुका यावल येथील राहणारे होते ते मागील चार वर्षा पासुन चुंचाळे गावात आपल्या सासरवाडीला कुटुंबासह राहात असे. याबाबत समाधान भिका पाटील यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस कर्मचारी अशोक जवरे हे करीत आहेत.