अद्याप दोन दिवस बाकी, चर्चेतूनच मार्ग निघू शकतो : गिरीश महाजन

Girish

 

मुंबई (वृत्तसंस्था) आमच्याकडून कुठेही टीका टिप्पणी केली जात नाही. शिवसेना म्हणते ठरल्याप्रमाणे करा, मात्र यासाठी त्यांनी चर्चेला बसायला हवे. चर्चेसाठी आमची दारं अजूनही उघडी आहे. तसेच, अजूनही काही बिघडले नाही, अद्याप दोन दिवस बाकी आहेत. आपण बसून यावर मार्ग काढू शकतो, शिवसेनेला उद्देशून भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

 

यावेळी महाजन यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिलेला आहे. निकाल लागून १३ दिवस झाले, तरी अद्याप सरकार स्थापन झाले नसल्याने लोकांचा रोष दिसत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. हे पाहता सरकार लवकर स्थापन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आमचे देखील प्रयत्न सुरू आहेत. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आम्ही हा निर्णय घेतला की, आपण एकत्र निवडणूक लढलेलो आहोत, या अगोदर पाच वर्षे आपण सोबत काम केले आहे. हे पाहता सरकार स्थापनेचा निर्णय आता लवकरच झाला पाहिजे. काही मतमतांतर असू शकतात, मात्र बसून हा विषय मार्गी लागेल, असे मला वाटते. कारण चर्चेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही,असेही ना. महाजन यांनी म्हटले आहे.

Protected Content