Home Cities जळगाव ‘त्या’ नराधम बापाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

‘त्या’ नराधम बापाला दोन दिवसांची पोलीस कोठडी


 

65145705

 

जळगाव (प्रतिनिधी) आपल्या पोटच्या मुलीवर एका नराधमाने सलग तीन वर्षे बलात्कार केल्याची घृणास्पद घटना काल शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत उघडकीस आली होती. या नराधम बापाला पोलिसांनी काल अटक करून आज (दि.३१) न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओ.के. भुतडा यांनी दिले आहेत.

शहरात महावितरण कंपनीमध्ये वाहन चालक असलेल्या या नराधमाने २०१६ ते २०१९ दरम्यान वेळोवेळी आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे सदर मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. हा नराधम पत्नी घरात नसताना मुलीला धमकी देवून अत्याचार करायचा. या सततच्या लैंगिक शोषणाला कंटाळून अखेर पिडीत मुलीने पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली होती. आरोपीतर्फे अॅड. इमरान हुसेन यांनी तर सरकारतर्फे अॅड.पी. चौधरी यांनी काम पहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound