भुसावळ (प्रतिनिधी ): विद्यार्थी आणि पालकांचा शैक्षणिक भविष्यासाठी दोन दिवसीय विशेष व्याख्यान इनर व्हिल क्लब भुसावळद्वारा आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते भगवान गाढे यांनी मार्गदर्शन केले. दोन दिवसांचा अभ्यास वर्गाचे उद्घाटन इनर व्हिल क्लब भुसावळ नवनिर्वाचित प्रेसिडेंट स्वाती देव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या सचिव वंदिता पारे उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी हाताश निराश न होता हा अभ्यासाचा खूप तणाव न घेता छोटी छोटी तंत्र अंगीभूत बाणावी व अभ्यास सुलभ करून घ्यावा असे उद्घाटन प्रसंगी स्वाती देव बोलत होत्या. या अभ्यास वर्गात आत्मविश्वास, एकाग्रता व स्मरणशक्ती कशी वाढवावी ,यशस्वी होण्याचे अविश्वसनीय मार्ग, गणित विज्ञान या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, नातं व त्यांच्यातला परिसंवाद, विद्यार्थी व पालक विश्वासपूर्ण नात व त्यांच्यातील संवाद यावर विशेष भगवान गाढे यांनी विवेचन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इनर व्हिल क्लबच्या पास्ट प्रेसिडेन्ट कमल सचदेव, पास्ट प्रेसिडेन्ट रजनी सावकारे,
आयएसओ रुचिता शर्मा, ट्रेझरर राज्यश्री कात्यायनी, सीसी अलका भटकर, वृषाली पाटील व सुनंदा भारुडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले