Home क्राईम लग्नाचे आमिष दाखऊन अत्याचार करणाऱ्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी

लग्नाचे आमिष दाखऊन अत्याचार करणाऱ्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी

0
31
jail11 2017071030

jail11 2017071030

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील अहिरवाडी येथील युवतीस लग्नाचे अमीष दाखवून व भावास जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत रावेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील अहिरवाडी येथील २० वर्षीय युवतीस के-हाळे (ता. रावेर) येथील जितेंद्र शांताराम महाजन ( वय ३९) हा गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचे अमीष दाखवत होता. तुला आयुष्य भर सांभाळेल व कुणाला याबाबत सांगीतले तर तुझ्या भावाला मारून टाकेल, समाजात तुझी बदनामी करेल. अशा धमक्या देत असे. दरम्यान त्याने दोन वेळा सदर युवतीवर बलात्कार केला. याबाबत युवतीने रावेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास उप निरीक्षक सुनील कदम, निलेश चौधरी, विकास पहुरकर, महिला पोलीस रईसा तडवी करत आहे.


Protected Content

Play sound