नांदेड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | नांदेड शहरातील चैतन्यनगर भागात असलेल्या सह्याद्रीनगर येथील एका दुकानाला ८ एप्रिल रोजी सकाळी आग लागली. त्यानंतर ही आग वाढत पाच दुकानांपर्यंत गेली. त्यात दोन सिलेंडरचा स्फोट झाला. दरम्यान, अग्निशमन विभागाने घटनास्थळी येऊन आग विझवली त्यामुळे कोणताही जीवीतहानी झाली नाही. मात्र जवळपास दहा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमध्ये पाच दुकानातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. नांदेड शहरातील चैतन्यनगर परिसरातील सह्याद्रीनगर येथे अरविंद नारलावार यांची पाच दुकाने आहेत. सकाळी सहाच्या एका दुकानातून धूर येत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. हळूहळू धुराचे लोळ वाढत जाऊन अखेर जोरदार आवाज झाला. त्यामुळे दुकानावरील टिनपत्रे उडून गेले.
एकाचवेळी दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने राहुल परदेशी, अलीखान बडूखान, केशव शिंदे यांची दुकाने जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. दोन तासानंतर त्यांनी ही आग आटोक्यात आणल्याचे सांगण्यात आले.