अमळनेर प्रतिनिधी । धुळे येथे दुध विक्री करून घरी परतणाऱ्या दुध विक्रेत्याच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुध विक्रेता दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना तालुक्यातील डांगर गावाजवळ घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, आधार लखा उर्फ लक्ष्मण पाटील(वय-४२ रा. जानवे ता. अमळनेर जि.जळगाव हे दुध विक्रीचा व्यवसाय करतात. २६ जून रोजी रात्री ११ वाजता आधार पाटील हे (एमएच १९ डीडी २७१) क्रमांकाच्या दुचाकीने धुळे येथून दुध विक्री करून घरी परतत असतांना अमळनेर धुळे रोडवरील तांबोडे नाल्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९ बीई ८७९०) क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात दुध विक्रेता विनोद पाटील हे ठार झाले. याप्रकरणी मयताचा भाचा विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक कैलास शिंदे करत आहे.