जळगाव प्रतिनिधी । अनेक गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना शहर पोलीस शाखेचे निरिक्षक देवीदान कुनगर व त्यांच्या सहकार्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केली असून त्यांच्याकडून देशी कट्टयासह अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत वृत्त असे की, जळगाव शहर वाहतूक शाखेचे पो.नि.देविदास कुनगर हे सहकारी योगेश पाटील व संदीप पाटील यांच्याससह गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेऊन कालिंका माता मंदिराकडून शहरात येत होते. दरम्यान, का. ऊ. कोल्हे विद्यालयाजवळ त्यांना एक डिझायर गाडी संशयास्पद अवस्थेत दिसून आली. त्यांनी याबाबत विचारणा केली असता दोन जण ही गाडी सुरू करून सुसाट वेगाने पळाले. यामुळे कुनगर यांनी आपल्या सहकार्यांसह त्यांचा पाठलाग सुरू केला.
जुन्या खेडी रोडमार्गे हे आरोपी भरधाव वेगाने कार चालवत पुढे निघाले. त्यांच्या मागे पोलिसांची गाडी असा पाठलाग सुरू झाला. दरम्यान, समोर एक वाहन आल्याने आरोपींची कार स्लो झाली. यामुळे कुनगर व त्यांच्या सहकार्यांनी तात्याने दोघांच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे जगदीश भगवान सपकाळे व आकाश उर्फ धडकन सपकाळे अशी आहेत. ते सराईत गुन्हेगार असून आधी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक हा तडीपार करण्यात आलेला आहे. त्यांना अटक करून वाहन जप्त करण्यात आले आहे. तर त्यांच्या कडून देशी कट्टयासह चॉपर व अन्य शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.