सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे आज दोन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात एका नगरपालिका कर्मचार्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे की, येथे दररोज कोरोनाचा रूग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने आज येथे दोन बाधीत रूग्ण निष्पन्न झाले आहेत. हे दोन्ही पुरूष असून एक नगरपालिका कर्मचारी तर एक निवृत्त शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून संबंधीत रूग्णांचा रहिवास असणार्या परिसरात उपाययोजनेस प्रारंभ केला आहे.
दरम्यान, आजच्या दोन रूग्णांना धरून येथील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ७४ झालेली आहे. यातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे.