Home आरोग्य चोपड्यात कोरोनाचे दोन रूग्ण : सतर्कता बाळगण्याचे आवाहन

चोपड्यात कोरोनाचे दोन रूग्ण : सतर्कता बाळगण्याचे आवाहन

0
70

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात कोरोनाचे दोन रूग्ण आढळून आले असून त्यांना सौम्य लक्षणे असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

कोविड-१९ या विषाणूचा जे-१ हा व्हेरियंट अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथे कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला रूग्ण आढळून आला होता. त्याच्यावर उपचार करून बरा झाल्याने या रूग्णाला घरी पाठविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते.

दरम्यान, यानंतर आता चोपडा तालुक्यातील दोन महिलांना कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे. या दोन्ही महिलांवर चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या दोन्ही महिलांना सौम्य लक्षणे असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोविडच्या संसर्गापासून कुणी घाबरू नका, मात्र लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असेही प्रशासनाने आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound