Home क्राईम मध्यरात्री दोन चुलत भावांना मारहाण करून लुटले !

मध्यरात्री दोन चुलत भावांना मारहाण करून लुटले !


भुसावळ-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नवोदय विद्यालयाजवळ दोन चुलत भावांचा रस्ता आडवून तीन जणांनी मारहाण करून त्यांच्याजवळील ६ हजार रूपयांची रोकड जबरी काढून नेल्याची घटना बुधवारी ४ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजता घडली आहे. याबाबत पहाटे ४ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे राहणारा इस्तियाक खान अजीज खान वय २९ हा त्याचा चुलत भाऊ साबीर खान याच्या सोबत बुधवारी ४ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास यावल येथून कासोदा येथे जात असतांना भुसावळ शहरातील नवोदय विद्यालयाजवळ संशयित आरोपी मयुर प्रकाश भोई, योगेश प्रकाश भोई आणि जितेश योगेश भोई तिन्ही रा. भोईवाडा, भुसावळ यांनी दोघ्ज्ञांचा रस्ता आडविला. त्यानंतर दोघांना बेदम मारहाण करून त्याच्याजवळील ६ हजारांची रोकड जबरी हिसकावून नेले.

हा प्रकार घडल्यानंतर इस्तीयाक खान यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे मयुर प्रकाश भोई, योगेश प्रकाश भोई आणि जितेश योगेश भोई तिन्ही रा. भोईवाडा, भुसावळ या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होता दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल खान सैय्यद हे करीत आहे.


Protected Content

Play sound