पसरणी घाटात दोन बसेसची धडक : ३३ जखमी

Satara bus Accident

सातारा, वृत्तसंस्था | जिल्ह्यातील पसरणी घाटात खासगी ट्रॅव्हल्स आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून त्यात ३३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पसरणी घाटात हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाबळेश्वरहून वाईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने पसरणी घाटात वाईहुन महाबळेश्वरला जाणाऱ्या शिवशाही बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी वाईमधील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, MH-06-BW-3575 क्रमांकाची शिवशाही बस वाईकडून महाबळेश्वरकडे पाचगणी घाटातून जात होती. यावेळी समोरून भरधाव वेगात येणारी क्रमांक MH-11-L-5999 ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली. यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅव्हल्स रस्त्यातच पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बसचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Protected Content