अमळनेर प्रतिनिधी । भरधाव जाणाऱ्या लक्झरी बसने दिलेल्या धडकेत दोन म्हशी ठार झाल्याची घटना मंगरूळ येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे धुळे रोडवर ३० रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास जाणार्या भरधाव लक्झरी बसने (क्रमांक एम एच १८ ए सी ३५१) दोन म्हशींना जोरदार धडक दिली. यात म्हशी जागीच ठार झाल्या. अपघात होतातच जोराचा आवाज झाल्याने नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. तर म्हशी मेल्याचे पाहून शेतकर्याला अश्रू अनावर झाले.