
अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील शालम नगर येथे रस्त्यावरून गाडी काढण्याच्या कारणावरून दोन भावांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिवारी २६ जुलै रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील शालम नगरात अन्सार शा रज्जाक शा फकीर वय ३० हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता शालम नगर येथे घरी असतांना रस्त्यावरून गाडी काढण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यावरून अन्सार शा फकीर आणि त्याचा भाऊ शाबीर शा रज्जाक शा फकीर या दोघांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या दोन्ही भावांवर अमळनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पुढील तपास पोहेकॉ संतोष पवार हे करीत आहे.



