धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द गावातील बसस्थानकाजवळ गावातील रस्ता वहिवाटच्या कारणावरून दोन भावांना गावातील चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. या संदर्भात शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश रामनारायण मालू (वय ५३ रा. पिंपरी खुर्द ता. धरणगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान ते २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराचे बांधकाम करत असताना गावात राहणारे ज्ञानेश्वर रामदास बडगुजर, गोपाल रामदास बडगुजर, रितेश ज्ञानेश्वर बडगुजर आणि दिगंबर बापू बडगुजर या चौघांनी वहिवाट जागेवरून मंगेश रामनारायण मालू याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच लाकडीकाठी हातावर मारून जीवेठार मानाची धमकी दिली. यावेळी भावाला मारत असल्याचे पाहून नितीन मालू हा देखील त्या ठिकाणी आला, त्याला देखील चौघांनी डोक्यावर आणि पाठीवर काठीने मारहाण केली. या संदर्भात मंगेश मालू यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली त्यानुसार शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.




