ताडपत्रीच्या कारखान्यात कामगाराकडून दोन भावांना मारहाण

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील एमआयडीसीतील ताडपत्री बनविण्याच्या कारखान्यात किरकोळ कारणावरून कामगाराने दोन भावांना शिवीगाळ व मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरूवार १३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घडला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता चाळीसगाव शहर पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, नदीम बाबुलाल चव्हाण वय २८ रा. एमआयडीसी, चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे एमआयडीत ताडपत्री बनविण्याचा कारखाना आहे. या ठिकाणी दर्शन कोल्हे हा कामाला आहे. दरम्यान, गुरूवार १३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता दर्शन कोल्हे याने कारखान्यात काम करण्याच्या कारणावरून नदीम चव्हाण व त्याचा भाऊ तनवीर चव्हाण या दोन भावांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच कारखान्यातील सामानांची तोडफोड करण्यात आली. शिवाय गावात दिसले तर पाय तोडून टाकेल अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर नदिम चव्हाण याने चाळीसगाव शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार दर्शन कोल्हे रा. खडकी ता अमळनेर याच्या विरोधात पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय महाजन हे करीत आहे.

Protected Content