मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत मुक्ताई-चांगदेव यात्रोत्सवात दोन मोटारसायकली लंपास करण्यात आल्या असून या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चिखली (ता. खामगाव) येथील रवींद्र पद्माकर मुके हे आपल्या एमएच २८-पी-०५२४ क्रमांकाच्या बजाज प्लॅटीना मोटारसायकलने मुक्ताई-चांगदेव यात्रेसाठी आले होते. कोथळी येथील जुने मुक्ताई मंदिर परिसरात स्मशानभूमीजवळ त्यांनी आपली दुचाकी लावली होती. मात्र ही मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ८ मार्च रोजी सकाळी घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसर्या घटनेत कोथळी येथील नितीन निवृत्ती चौधरी यांची दुचाकी चोरीस गेली आहे. कोथळी येथील विठ्ठल मंदिराजवळून त्यांची एमएच१९- सीएच ४४१७ क्रमांकाची स्प्लेंडर ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्यांनी या संदर्भात फिर्याद नोंदविल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंदे तसेच चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असतांनाच मोटारसायकल चोरींच्या घटनेत देखील वाढ झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.