भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील हॉटेल चायला जवळ बेकायदेशीर गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेवून दहशत माजणाऱ्या दोन संशयित आरोपींवर रविवारी २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रात्री ८ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरातील हॉटेल चायला जवळून बेकायदेशीरित्या दोन जण हाताता गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती वरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार वरणगाव पोलीसांनी रविवारी २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई केली. यावेळी पोलीसांनी संशयित आरोपी सिध्दार्थ संतोष भालेराव वय २३ आणि अनिरूध्द कैलास ठाकूर वय २० दोन्ही रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सिध्दार्थ संतोष भालेराव वय २३ आणि अनिरूध्द कैलास ठाकूर वय २० दोन्ही रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव या दोघांवर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे हे करीत आहे.