जळगाव प्रतिनिधी । चोरीची दुचाकी घेवून फिरणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली
याबाबत माहिती अशी की, जामनेर शहरात गांधी चौकात फरार असलेल्या संशयित आरोपी संजय वैजनाथ जटाले (वय-३७) रा. देऊळगाव (गुजरी) ता. जामनेर हा २५ हजार रूपये किंमतीची (एमएच १९ बीव्ही ०११२) या बनावट क्रमांकाच्या गडीवर गावात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. दुचाकीबाबत जामनेर पोलीस ठाण्यात भाग ५, गुरनं २२४/२९१४ पथकाने कारवाई करत त्यांची कसून चौकशी केली असता माझ्याजवळील दुचाकी ही गेल्या सात ते आठ महिन्यांपासून वापरत असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्याने ही दुचाकी सुनिल एकनाथ काळे रा. तोंडापूर ता.जामनेर याच्याकडून घेतली असल्याचे सांगितले. दरम्यान, स्थानिक पोलीसांनी संशयित आरोपी सुनिल काळे याला तोंडापूर येथून ताब्यात घेतले. दुचाकी कोठून आणली याबाबत चौकशी सुरू आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नंदलाल पाटील, पो.हे.कॉ. विकास वाघ, पो.ना. विजय पाटील, पोकॉ सचिन महाजन, पो.कॉ. भगवान पाटील यांनी कारवाई केली.