पहूर पेठ ग्रामपंचायततर्फे स्वच्छता अभियानास सुरूवात

पहूर ता.जामनेर (रविंद्र लाठे)। पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतंर्गत असलेल्या वॉर्ड क्रमांक १ संतोषीमातानगर मधील विविध समस्यांनी ग्रासलेल्या रहिवाशांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर ‘लाईव्ह ट्रेंन्डस न्युज’ने सुद्धा हे वृत्त तात्काळ प्रसारीत केल्यामुळे प्रशासनाने तात्काळ याची दखल घेत साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे.

वॉर्ड क्रमांक १ मधील समस्यां विषयी ग्रामपंचायतीमध्ये प्रविण कुमावत व शरद बेलपत्रे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात होते. यानंतर सरपंच पती रामेश्वर पाटील यांनी समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सांगीतले की समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील आहे, परंतु वसुली न झाल्यामुळे कर्मचारी वर्गाचे पगार रखडले आहेत. समस्यांविषयी जाण ग्रामपंचायतीला आहे, परंतु कोरोना सारख्या महामारीमुळे शासकीय अनुदान मिळत नाही आणि यावर पर्याय म्हणून आम्ही भूमिका मांडली की, आपण वसूली करावी वसूल झालेल्या रक्कमेत ग्रामपंचायत रक्कम सामाविष्ट करेल आणि प्रत्यक्षात कामे देखील प्रगतीपथावर राहतील.

आपल्याला हवा असलेला आपल्या परिसराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. सदरच्या समस्या १० ते १५ वर्षांपासून रखडलेल्या असल्याने आपण येणाऱ्या काळात सर्व समस्या सोडवू आणि या समस्या सोडविण्यासाठी जनतेचे देखील सहकार्य लाभले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

पहूर पेठ येथील संतोषीमाता नगर व गोविंद नगर भागात रस्ते, गटारी, आदि समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत या समस्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीकांकडून होत होता. सरपंच नीता रामेश्वर पाटील यांनी दखल घेत संतोषीमातानगरमधील विविध ठिकाणी मुरूम टाकण्यात आला.

दरम्यान ग्रामपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांनी वार्ड क्रमांक १ मध्ये नाल्यांची साफसफाई केल्याने संतोषी माता नगरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार सरपंच नीता रामेश्वर पाटील ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गावकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांनीही वेळोवेळी कर भरावा, जेणेकरून ग्रामपंचायतीला मदत होऊन विकास कामेही होतील तसेच कर्मचारी यांचा पगार वेळेवर होईल.

Protected Content