जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोर्टातील केस मागे घेण्यास नकार देणाऱ्या तरुणाला चौघांनी तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या चौघांपैकी दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे.
सनी उर्फ फौजी बालकृष्ण जाधव वय 24 आणि सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण वय 22 दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नवे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुषार ईश्वर सोनवणे (वय-१८) रा. साईबाबा मंदिर जवळ, मेहरून, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्याचा मित्राचा वाढदिवस असल्या कारणामुळे तुषार सोनवणे हा बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता शिरसोली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ मित्रांसोबत होता. त्यावेळी त्याच्याजवळ सनी उर्फ फौजी बालकृष्ण जाधव, शुभम पाटील, सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण आणि गोलू उर्फ चेतन चौधरी चौघे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे तिथे आले. त्यांनी तुषारला कोर्टात असलेले केस मागे घे असे सांगून चौघांनी तुषारला बेदम मारहाण केली. तर सनी याने त्याच्या कमरेतून तीक्ष्ण हत्यार काढून हातावर वार करून जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सनी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध प्रकारची 10 गुन्हे दाखल आहे. एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी सनी उर्फ फौजी आणि सचिन उर्फ कोंडा यांना सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे.