अमळनेर प्रतिनिधी । मारवड पोलिसांनी अमळगाव आणि निंभोरा येथे धाड टाकून दोन सट्टा जुगार खेळणाऱ्यांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला आणि किशोर पाटील, फिरोज बागवान, सुनील तेली, सागर नेरकर यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अमळगाव येथे बसस्थानकाजवळ छापा टाकला असता जगदीश माधव चौधरी हा सट्ट्यांचे आकडे घेताना आढळून आला. त्याच्या जवळून 530 रुपये आणि साहित्य जप्त करण्यात आले तर अडीच वाजेच्या सुमारास निंभोरा येथे छापा टाकला असता जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाजूला रवींद्र बाबूलाल बाविस्कर हा सट्टा आकडे घेताना आढळून आला. त्याच्या जवळून 480 रुपये व साहित्य जप्त करण्यात आले. दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.