जळगाव प्रतिनिधी । लोन मिळविण्यासाठी लागणारे प्रोसेसिंग फी म्हणून जळगाव जिल्ह्यातील शेकडो नागरिकांना १६ लाखात फसवणूक करणाऱ्या अमरावती येथून रामानंद पोलीसांनी अटक केली आहे. दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गरीब व आर्थिक दुर्बल नागरीकांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एका खासगी कंपनीने जळगाव जिल्ह्यात सात जिल्हा प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात अनेकांना लोन मिळवून देण्याच्या नावाखाली कर्ज पास होण्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून प्रत्येकाकडून २ हजार रूपये म्हणून जिल्हा प्रतिनिधींनी घेण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात शेकडो नागरीकांकडून सुमारे १६ लाख रूपये वसूल करून फरास झाले होते. याप्रकरणी खंडू महाले रा. खंडेराव नगर यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुरनं 366/2020, भादवी 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक कार्यालयातील नरेंद्र वारूळे यांनी मोबाईल नंबरच्या ट्रेस करून संशयित एक आरोपी हा वर्धा तर दुसरा अमळनेर तालुक्यात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुरास रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ संजय सपकाळे, इकबाल पिंजारी, अनमोल पटेल हे वर्धा येथे रवाना झाले. ८ एप्रिल रोजी सायंकाळी संशयित आरोपी आशीष अशोकराव जमेकर (वय-३८) रा. वर्धा याला अटक केली तर दुसरा पंकज सर्जेराव पाटील (वय-३२) रा. वावडे ता. अमळनेर याला राहत्या घरातून अटक केली आहे. दोघांना १० एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.