तालुक्यातील आव्हाणे शिवारात मोबाईल लांबविणारे दोघे अटकेत; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे शिवारातील सक्षम पार्क येथे घरातील मोबाईल चोरी करून घराला बाहेरून कडी लावून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून पुढील कारवाईसाठी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहिती अशी की, अनिल सखाराम शिंदे (वय-४३) रा. सक्षम पार्क, आव्हाणे शिवार, जळगाव हे जेवण करून झोपल्यानंतर हे सकाळी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता शेजारी राहणारे मनोज अभिमन राससिंग यांनी फोन करून सकाळी फिरण्यास जाण्यासाठी अनिल शिंदे यांना फोन लावत होते फोन लागला नसल्याने घराजवळून पाहिले असता घराला बाहेरून अज्ञात चोरट्यांनी घरातील मोबाईल व ठेवलेले बुटांची चोरी करत घराला बाहेरून कळी लावून पळ काढल्याचे लक्षात आले. याप्रकराणी अनिल शिंदे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत संशयित आरोपी विठ्ठल उर्फ सोन्या अशोक लोंडे (वय-२५) आणि मिलिंद उर्फ अप्पा भिका व्यहाळे (वय-२८) दोन्ही रा. राजमालती नगर जळगाव यांना अटक केली. पुढील कारवाईसाठी तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.

ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोउनि रविंद्र गिरासे, स.फौ. विजय पाटील, अशोक महाजन, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, किरण चौधरी यांनी कारवाई केली.

 

Protected Content