यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल वन विभाग अंतर्गत असलेल्या चोपडा तालुक्यातील वैजापूर वनक्षेत्रात अवैधरित्या आढळून आलेली सुमारे अडीच लाख किमतीची अडीच हजार लीटर हातभट्टीची दारू सात हजार रुपये किमतीचे ३५ बॅरल असा दोन लाख ५२ हजार रुपयांच्या मुद्देमाल वन विभागाने जप्त करत जागेवरच नष्ट केला आहे. वन विभागात अशा प्रकारे गैरकारभार करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल वनविभाग अंतर्गत असलेल्या चोपडा तालुक्यातील वैजापूर वनक्षेत्रातील खाऱ्या-पाडाव परिमंडळात देवझाड वनपरिसरात अवैध हातभट्टीची दारू साठा असल्याची गुप्त माहितीच्या आधारे धुळे वनविभागाचे वनसंरक्षक नीनू सोमराज, उपवन संरक्षक जमीर शेख, विभागीय दक्षता अधिकारी राजेंद्र सदगीर, सहाय्यक वन संरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर वनक्षेत्रपाल एस. एम. सोनवणे, चोपडा ग्रामीण पोलीस पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, वनपाल खलील याकुब, शेख अश्विनी धात्रक, अर्चना गवते, आय. एस. तडवी, सी.आर.कोळी, वंदना बारेला, संदीप ठाकरे, लोकेश बारेला, हुकाऱ्या बारेला, हेमलता बारेला, सुनील भोई, संदीप भोई, भारसिंग बारेला, विजय शिरसाट, बाजीराव बारेला, ज्योती बारेला, धनाबाई बारेला, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पारधी, लोटन सोनवणे, प्रताप कोकणी, सुशील कोळी, भागवत पाटील, निवृत्ती पाटील, निखिल पाटील असे सुमारे ४० जणांच्या वन विभागाच्या पथकाने सुमारे दोन लाख ५२ हजार रुपयाची अवैध हातभट्टीची दारूसह, रसायन व साहित्य जागेवर नष्ट केले आहे. याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमुळे यावल वनविभागात अवैध करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.