Home क्राईम अस्वलाची शिकार करणारे दोन आरोपी अटकेत

अस्वलाची शिकार करणारे दोन आरोपी अटकेत

0
38

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मध्य प्रदेशातील धामणगाव शेतात एका अस्वलाची शिकार करून मुक्ताईनगर तालुक्याच्या धाबा पिंप्री येथे लपलेल्या दोन्ही आरोपींना महाराष्ट्र व मध्यप्रदेश वनविभागाच्या अधिकार्‍यांनी आज सकाळी अटक केली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील धामणगाव येथे एका अस्वलाची शिकार करणारे नवलसिंग थत्तरसिंग पावरा आणि कन्नकसिंग थत्तरसिंग पावरा हे दोन आरोपी हे मुक्ताईनगर तालुक्यातील धाबापिंप्री येथे लपून बसलेले असल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती. यानुसार महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या वन खात्याच्या संयुक्त पथकाने आज या दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. याबाबत अद्याप गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound