पारोळा प्रतिनिधी । शहरातील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासाहेब यु.एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याच्या आज निरोप समारंभ मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला.
सुरुवातीला बालाजी महाराजांचे पूजन करून बारावीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी देशाविषयी प्रेम व एकजुटता व अभ्यासात एकाग्रता याविषयी डॉ.सचिन बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिवाजी पाटील, वैशाली पाटील, भूषण शिंदे, विजय बडगुजर आणि श्रीकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात श्री करोडपती सर यांनी सदर विद्यार्थी बालवाडीपासून बारावीपर्यंत आपल्या संकुलात शिक्षण घेत वाढले व आता उंच गरुड झेप घेण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन शाळेचे आई-वडिलांचे गावाचे जिल्ह्याचे राज्याचे नाव कसे देश पातळीवर नेता येईल, याकडे आपले चांगले पाऊल असले पाहिजे. असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु.एच.करोडपती तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ.सचिन उमेश बडगुजर तसेच संस्थेचे सदस्य डॉ. चेतन करोडपती, बालाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत पाटील, एम.यु. करोडपती इंग्लिश मीडियमचे प्राचार्य श्रीकांत पाटील आणि आप्पासाहेब यु.एस.करोडपती विद्यालयाचे प्राचार्य विजय बडगुजर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी विद्यालयातील सर्व शिक्षकांचे स्वागत व सत्कार केला व आपले मनोगत व्यक्त केले शाळेने आम्हास घडविले सुसंस्कृत केले याचे आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच यावेळी तेजस्विनी भावसार, सलोनी मेंटकर, चेतन पाटील, वैभव पाटील, अविनाश पाटील, अंजली अमृतकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच उपशिक्षक शिवाजी पाटील यांनी मांडले तर सूत्रसंचालन बारावीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी प्रियांका पाटील व हर्षदा कुंभार त्यांनी केले. दीपक भावसार यांनी आभार मानले.