बारावीतील गुणांचे महत्व नाहीच ! : ‘या’ परिक्षेतून मिळणार प्रवेश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बारावीतील गुणांवरून विविध पदव्यांना प्रवेश मिळण्याची प्रक्रिया आता रद्द होणार असून याच्या ऐवजी एकाच सामईक प्रवेश परिक्षेच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. आज युजीसीने याबाबत घोषणा केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने  सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा  अर्थात सीयुईडी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठ, जेएनयू आणि जामियासह सर्व केंद्रीय विद्यापीठांना पुढील शैक्षणिक वर्षापासून याच प्रवेश परिक्षेतील गुणांच्या आधारावर प्रवेश घ्यावा लागेल. ही परीक्षा हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, आसामी, बंगाली, पंजाबी, उडिया आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी  द्वारे घेतली जाईल अशी माहिती युजीसीने दिली आहे.

यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. याबाबत अधिक माहिती nta.ac.in  या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.   राज्य किंवा खाजगी डीम्ड विद्यापीठे देखील या परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतात.

आता सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बोर्डाच्या परीक्षेत म्हणजेच १२वीमध्ये मिळालेल्या गुणांना कोणतेही महत्त्व दिले जाणार नाही. आता केंद्रीय विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व प्रवेशांसाठी, पात्रता निकषांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर १२वीच्या गुणांचा कोणताही परिणाम होणार नाही. हे नियम शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून सुरू होतील.

 

Protected Content