Home न्याय-निवाडा भुसावळ वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. तुषार पाटील

भुसावळ वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. तुषार पाटील

0
72


भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहर व तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. तुषार पाटील तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. धनराज मगर यांची निवड करण्यात आली.

भुसावळ तालुका वकील संघाच्या निवडणुकीत ७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. तर रात्री आठ वाजता निकाल जाहीर झाला. अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी लढतील तुषार पाटील यांचा ४८ मतांनी विजय झाले. तर उपाध्यक्षपदी धनराज मगर हे तीन मतांनी विजयी झाले. सहसचिव पदावर पुरुषोत्तम पाटील यांनी विजय संपादन केला. तर महिला प्रतिनिधी पद जास्वंदी भंडारी यांनी पटकावले. कोषाध्यक्षपदी राजेश कोळी व ग्रंथपाल पदासाठी संजय तेलगोटे विजयी झाले.

याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूपेश बाविस्कर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विनोद तायडे, योगेश दलाल, धीरेंद्र पाल यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound